ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत स्वाइन फ्लूचे १४ रु ग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका ३५ वर्षीय महिलेचा मुंबईत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, आता स्वाइन फ्लूचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.ठाणे शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत या रोगाची लागण झालेले १४ रु ग्ण आढळले आहेत. यातील एक रु ग्ण मुलुंड येथे राहणारा आहे, तर १३ रु ग्ण ठाण्यातील असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. घोडबंदर परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका रु ग्णालयात मृत्यू झाला. ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी ही माहिती दिली. तसेच ठाणे महापालिकेच्या हद्दीत या रोगावर उपचार करण्यासाठी कळवा येथील महापालिकेच्या रु ग्णालयात स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. तेथे मुबलक औषधसाठा आहे. मात्र, येथे अद्याप एकही रु ग्ण उपचारासाठी दाखल झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु, त्याच वेळी शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १४ रु ग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबतीत विविध खाजगी रुग्णालयांतही योग्य अशी उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच या रोगाची लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात आढळले स्वाइन फ्लूचे १४ रुग्ण
By admin | Published: February 19, 2015 2:08 AM