Join us

मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 5:21 AM

मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या बेस्टच्या बसगाड्या सहा वर्षांतच खिळखिळ्या झाल्या आहेत

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या बेस्टच्या बसगाड्या सहा वर्षांतच खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी बेस्ट उपक्रमाला त्यांची डागडुजी करावी लागेल. मात्र, अशा तब्बल तीनशे बसगाड्यांसाठी बेस्टला १४ कोटींचा फटका बसणार आहे. बेस्ट उपक्रमाने २०११ मध्ये केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ५५० मोठ्या व २५० मिडी गाड्या खरेदी केल्या. मात्र, मुंबई शहर समुद्रकिनारी असल्याने येथील वातावरण दमट असते. या दमट वातावरणामुळे बसमधील स्टील स्ट्रक्चरचे नुकसान झाले. त्यामुळे गाड्यांच्या दुरुस्तीचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात तीनशे बसेसची दुरुस्ती होईल, यासाठी बेस्टला प्रत्येक बसमागे पाच लाख ७३ हजार रुपए खर्च करावा लागेल.

टॅग्स :बेस्टमुंबई