भिवंडी : शहरातील न्यू कणेरी येथील कार्यालयात वीजचोरी केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे पूर्व विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष हारून खान यांना न्यायालयाने शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. टोरेंट पॉवर कंपनीच्या अधिकाºयांनी त्यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी गेल्या सहा महिन्यांपासून वीजपुरवठा करणाºया टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीविरोधात हल्लाबोल केला होता. त्यांनी मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलने करून या वीजकंपनीला ‘चले जाव’चा इशारा दिला होता. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याची दखल घेतल्यानंतर वीजकंपनीच्या विरोधातील आंदोलन थांबवण्यात आले. वीजचोरी प्रकरणात याच पक्षाचा पदाधिकारी हारून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.दंड न भरल्याने कारवाईहारून शेख यांच्या कणेरी येथील कार्यालयावर ६ नोव्हेंबर रोजी दक्षता पथकाने छापा टाकून वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणला होता. टोरेंट पॉवर लिमिटेडने त्यांना ९० हजार रुपयांचा दंडही आकारला होता. परंतु, हारून यांनी दंडाची रक्कम न भरल्याने वीजकंपनीने त्यांच्याविरोधात वीजचोरीची तक्र ार दाखल केली. या तक्र ारीच्या आधारे पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले.