14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अकोला आयुक्तांच्या बदलीनंतरही निमा अरोरा यांच्या ज्येष्ठतेचा प्रश्न कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 09:58 AM2021-07-31T09:58:12+5:302021-07-31T09:58:28+5:30
Officer Transfer News: राज्य शासनाने शुक्रवारी १४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अकोला महापालिकेचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांची बदली हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून करत अकोल्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यात ज्येष्ठतेचा निर्माण झालेला वाद सोडविण्याचा प्रयत्न शासनाने केला.
मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी १४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अकोला महापालिकेचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांची बदली हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून करत अकोल्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यात ज्येष्ठतेचा निर्माण झालेला वाद सोडविण्याचा प्रयत्न शासनाने केला. मात्र, त्याचवेळी गोविंद बोडके यांना महापालिका आयुक्तपदी नेमून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासंदर्भातील ज्येष्ठतेचा प्रश्न कायम ठेवला आहे.
निमा अरोरा याआधी अकोला महापालिकेच्या आयुक्त तर पापळकर हे अकोल्याचे जिल्हाधिकारी होते. मात्र अरोरा यांना जिल्हाधिकारी आणि पापळकर यांना महापालिका आयुक्तपदी अकोल्यातच नेमण्यात आले होते. अरोरा या २०१४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत तर पापळकर हे २०१० च्या बॅचचे आहेत. त्यामुळे ज्येष्ठ-कनिष्ठतेचा विषय चांगलाच चर्चिला गेला. पापळकर हे महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले नव्हते. आता त्यांची हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आणि त्यांच्या जागेवर गोविंद बोडके यांना आणले आहे. बोडके हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंत ते वीज वितरण कंपनी; कल्याण येथे सह व्यवस्थापकीय संचालक होते.
राज्याचे कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली उद्योग, ऊर्जा विभाग; मंत्रालय येथे सहसचिवपदी करण्यात आली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे महाबीज; अकोलाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. एम. देवेंद्र सिंह हे महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद; पुणेचे नवे संचालक असतील. राहुल कर्डिले यांची नियुक्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे सह महानगर आयुक्तपदी करण्यात आली.
जिल्हा जातपडताळणी समिती; गोंदियाचे अध्यक्ष संजय दैने हे मालेगाव महापालिकेचे नवे आयुक्त असतील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाचे सचिव असतील. एमआयडीसी; मुंबईचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी.मलिकनेर यांना त्याच पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचे नाव सध्याचे पद बदलीचे ठिकाण
१) दीपेंद्रसिंह कुशवाह आयुक्त, कौशल्य विकास सहसचिव, उद्योग विभाग मंत्रालय
२) रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली एमडी महाबीज, अकोला
३) जितेंद्र पापळकर महापालिका आयुक्त अकोला जिल्हाधिकारी हिंगोली
४) राहुल कर्डिले नियुक्तीच्या प्रतीक्षेत सह महानगर आयुक्त, एमएमआरडीए
५) एम.देवेंद्र सिंह नियुक्तीच्या प्रतीक्षेत संचालक, महा. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
६) गोविंद बोडखे एमडी, महावितरण आयुक्त अकोला महापालिका
७) एस.जी.देशमुख अध्यक्ष, जातपडताळणी समिती ठाणे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक; मुंबई
८) एन.आर.गटणे अध्यक्ष, जातपडताळणी समिती पालघर आयुक्त नांदेड महापालिका
९) संजय दैने अध्यक्ष, जातपडताळणी समिती गोंदिया आयुक्त मालेगाव महापालिका
१०) अनिल पाटील एमडी अण्णासाहेब पाटील महामंडळ सचिव, प्रवेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई
११) एम.डी.मलिकनेर सह मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी
(आयएएस झाल्यानंतरची नियुक्ती)
१२) सुरेश जाधव नियुक्तीच्या प्रतीक्षेत कामगार आयुक्त, मुंबई
१३) प्रताप जाधव विभागीय उपायुक्त, पुणे उपमहासंचालक, यशदा पुणे
१४) कुमार खैरे नियुक्तीच्या प्रतीक्षेत सह व्यव. संचालक, चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक मंडळ