१४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली, भापकर राज्य क्रीडा आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:06 AM2019-02-09T06:06:30+5:302019-02-09T06:06:54+5:30
सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे नवे विभागीय विभागीय आयुक्त असतील. सध्याचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी बदली केली आहे.
मुंबई : सुनील केंद्रेकर हे औरंगाबादचे नवे विभागीय विभागीय आयुक्त असतील. सध्याचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी बदली केली आहे. १४ आयएएस अधिकाºयांची शासनाने शुक्रवारी बदली केली.
केंद्रेकर हे आतापर्यंत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण संचालक होते. पशुसंवर्धन आयुक्त; पुणे के.बी.उमप यांची बदली मेडा; पुणेच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. जी.बी.पाटील यांची बदली मंत्रालयात कृषी विभागाचे सहसचिवपदी करण्यात आली आहे. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डी.बी.देसाई हे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. स्वच्छ महाराष्ट्रअभियानचे राज्य संचालक डॉ.अविनाश टेकाळे यांची जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. सध्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे राज्याचे नवे पशुसंवर्धन आयुक्त असतील. नागपूरचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त ऋषिकेश मोडक हे वाशिमचे नवे जिल्हाधिकारी असतील. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार हे वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून जात आहेत. वर्धेचे सध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी असतील. सोलापूरचे पालिका आयुक्त अविनाश ठाकणे जळगावचे जिल्हाधिकारी असतील. तेथे जिल्हाधिकारी असलेले किशोरराजे निंबाळकर नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तळोदा; नंदुरबार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक विनय गौडा हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. खेड; पुणे येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक आयुष प्रसाद हे अकोला जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. जितेंद्र डुडी यांची बदली तळोदा; जि.नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक म्हणून करण्यात आली आहे.