नेपाळमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेला १४ किलो चरस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:51+5:302021-03-10T04:06:51+5:30
कांदिवली एएनसीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नेपाळमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेला १४ किलो चरस अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ...
कांदिवली एएनसीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नेपाळमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेला १४ किलो चरस अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने जप्त केला. परबेज महामजान अन्सारी (२३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो नेपाळी गँगचा साथीदार आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी एक जण ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती एएनसीला मिळाली हाेती. त्यानुसार एएनसीच्या कांदिवली युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तेथे सापळा रचून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत १४ किलो ५६ ग्रॅम चरस सापडला. याची किंमत २ कोटी ८० लाख रुपये आहे. याप्रकरणी अन्सारीला अटक करण्यात आली. नेपाळमधून त्याने हा चरस आणल्याची माहिती समोर आली. न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.