एनसीबीकडून १४ किलो अमली पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:05 AM2021-04-29T04:05:22+5:302021-04-29T04:05:22+5:30
गोवंडीतून तिघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) मुंबई महानगरात मादक पदार्थविरोधातील कारवाईचे सत्र ...
गोवंडीतून तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) मुंबई महानगरात मादक पदार्थविरोधातील कारवाईचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसात १४ किलो ड्रग्ज जप्त केले. विविध दोन ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली असून तिघांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आलम नूर इस्लाम मलिक, सिकंदर हुसेन सय्यद व रशीद सिकंदर सय्यद अशी अटक आराेपींची नावे असून ते शिवाजीनगरातील गोवंडी परिसरात राहतात. गोवंडीमध्ये अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने नूर मलिक याच्या घरी छापा टाकला. तेथील २३० ग्रॅम गांजा, १० मेफेड्रोन जप्त केले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर सिकंदर सय्यदच्या घरी छापा टाकून १३.६ किलो सिरप जप्त केला. त्याचा साथीदार रशीदला अटक केली. दोघे सराईत तस्कर असून गेल्यावर्षी सिकंदरवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस व अन्य गुन्हे दाखल आहेत.
..........................