Join us

उद्योगांमध्ये १४ लाख कामगार कामावर रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:57 AM

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील अत्यावश्यकसेवांचे उत्पादन करणाºया व निरंतन प्रक्रिया उद्योग घटकांना उत्पादनासाठी मंजूरी देण्यात आली होती.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील बहुसंख्य उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. थंडावलेल्या उद्योग चक्राला आता गती दिली जात आहे. ९ जूनपर्यंत राज्यातील ५७ हजार ६७८ उद्योग सुरू झाले असून त्यात १४ लाख १६ हजार ६८० कामगार रुजू झाल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यात सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समावेश आहे.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील अत्यावश्यकसेवांचे उत्पादन करणाºया व निरंतन प्रक्रिया उद्योग घटकांना उत्पादनासाठी मंजूरी देण्यात आली होती. या टाळेबंदीच्या काळात अटी व शर्तीनुसार उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी स्री१े्र२२्रङ्मल्ल.े्रूि.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर अर्ज करून परवानगी घेण्याचे आवाहन उद्योग विभागाच्यावतीने करण्यात आले होते. तर, लॉकडाऊनच्या दुसºया व पाचव्या टप्प्यात राज्यातील मुंबई पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या महत्वाच्या जिल्ह्यांसह इतर प्रादेशिक विभागांतून ५७ हजार ६७८ उद्योगांनी परवानगी घेत उत्पादन प्रक्रिया सुरू केल्याचे एमआयडीसीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :स्थलांतरणकामगार