Join us

आणखी १४ मंत्रिपदे रिक्त, पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मंत्रिपदे झाली २६

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 6:31 AM

मंत्रिपदे झाली २६, आणखी एका विस्ताराकडे इच्छुकांचे लक्ष

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार का, ही चर्चा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कायम आहे. सध्या मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आणि २६ मंत्री झाले आहेत. एकूण आमदारांच्या १५ % म्हणजे ४३ पर्यंत मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्याने आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष  आहे. एकूण २९ मंत्रिपदे व्यापली गेली आहेत. अजूनही १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनंतर झाला.

कोणत्या खात्यांचे होऊ शकते वाटप?

मुख्यमंत्र्यांकडील खाती : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान,  माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण, खार जमिनी विकास, अल्पसंख्याक विकास व औफाक. यापैकी नगरविकास, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम ही खाती मुख्यमंत्री शिंदे स्वत:कडेच राखतील. उर्वरित खाती ते राष्ट्रवादीला देणार का की आगामी काळातील विस्तारात आपल्या आमदारांसाठी राखून ठेवणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडील खाती : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार. महाविकास आघाडीत अजित पवार हे वित्तमंत्री होते तरी दोघांतील मैत्रीखातर फडणवीस हे खाते त्यांच्याकडे सोपवतात का हे पाहावे लागेल. गृह, गृहनिर्माण ही खाती फडणवीसांकडेच राहण्याची शक्यता असून त्यांच्याकडील अन्य खाती ते भाजपमधील आमदारांसाठी ठेवतात की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अतिरिक्त खाती असलेले अन्य मंत्री भाजप  राधाकृष्ण विखे पाटील (महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास)सुधीर मुनगंटीवार (वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय)चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य)गिरीश महाजन (ग्रामविकास-पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण)रवींद्र चव्हाण (सार्व. बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण)मंगलप्रभात लोढा (पर्यटन, काैशल्य विकास आणि उद्योजगत, महिला व बालविकास)अतुल सावे (सहकार, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग)

 शिंदे गट  दीपक केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा)तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण)संदीपान भुमरे (रोजगार हमी, फलोत्पादन)दादाजी भुसे (बंदरे व खनिकर्म)

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारमहाराष्ट्र सरकार