प्रवाशांसाठी १४ नवे पूल, मार्च अखेरपर्यंत ५ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:55 AM2017-10-25T01:55:39+5:302017-10-25T01:55:42+5:30

मुंबई : उपनगरीय सेवेच्या तब्बल ३८ लाख प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे १४ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

14 new bridges for the passengers, 5 farther bridge passenger services till the end of March | प्रवाशांसाठी १४ नवे पूल, मार्च अखेरपर्यंत ५ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

प्रवाशांसाठी १४ नवे पूल, मार्च अखेरपर्यंत ५ पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत

Next

मुंबई : उपनगरीय सेवेच्या तब्बल ३८ लाख प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे १४ पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी मार्च २०१८ अखेर ५ पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. तर २६ पादचारी पुलांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे.
मुंबईतील विकासकामांमुळे ‘ट्रॅफिक जाम’मधून सुटका मिळावी यासाठी प्रवाशांचा रेल्वेकडे कल वाढला आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेने प्रवास करणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. पश्चिम रेल्वे स्थानकांजवळ जागा कमी असल्याने पादचारी पुलांच्या निर्माण कार्यासाठी अडथळे निर्माण होत होते. मात्र त्यावर योग्य तोडगा काढण्यात आला आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसंबंधी महाव्यवस्थापकांना सर्वाधिकार दिले. त्यानुसार पादचारी पूल उभारण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन सरसावले आहे. सध्या पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी वेगाने पावले उचलण्यात येत आहेत. हे विलंबाने घडत असले तरी ते स्वागतार्ह आहे, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड, माटुंगा रोड, सांताक्रुझ, गोरेगाव, कांदिवली, भार्इंदर, वांद्रे, मालाड, कांदिवली-बोरीवली पोईसर नाला येथे पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. खार आणि विरार स्थानकात प्रत्येकी २ पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी लोअर परळ, खार, माटुंगा रोड, गोरेगाव आणि सांताक्रुझ येथे पादचारी पुलाचे काम मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. हे पूल पूर्ण करून तत्काळ प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. यापैकी पोईसर नाल्यावरील पादचारी पूल हा महापालिका उभारणार आहे.
सद्य:स्थितीत पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांसाठी १०९ पादचारी पूल आहेत. पादचारी पूल हा घटक आधी प्रवासी सुविधा यांमध्ये गणला जात होता. मात्र एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर स्थानक अनिवार्य गोष्टींमध्ये पादचारी पुलाचा समावेश करण्यात आला. यामुळे प्रशासनाला काम करताना येणाºया ‘विविध’अडचणी आता दूर होत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
>मार्च २०१८ अखेर ५ पादचारी पूल सेवेत
पश्चिम रेल्वेवर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवासी सुविधांसाठी पश्चिम रेल्वेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्या अंतर्गत पादचारी पुलाचा प्रश्न सोडवण्यात येत आहे. मार्च अखेर ५ पादचारी पुलांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित पूलदेखील वेळेच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुलाच्या निर्माण कार्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांना सूचना केल्या आहेत.
- मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे

Web Title: 14 new bridges for the passengers, 5 farther bridge passenger services till the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.