मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून लोकल प्रवाशांसाठी १४ नव्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवा वाढविण्यासाठी विरार-डहाणू दरम्यान धावणारी मेमू सेवा बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. १ सप्टेंबरपासून नव्या फेऱ्यांची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.चर्चगेटहून वसईसाठी सुटणारी १९.४0 ची महिला विशेष लोकल विरारपर्यंत धावेल. ही लोकल विरार येथे २१.0६ वाजता पोहोचेल. एकूण १४ फेऱ्यांपैकी दहा फेऱ्या विरार ते डहाणू, चार दादर आणि चर्चगेट ते डहाणू दरम्यानच्या आहेत. वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या १,३0५ वरून १,३१९ वर पोहोचल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा प. रेकडून व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)लोकलसुटणारपोहोचणारविरार-डहाणू५.३५ वा.६.५३ वा.चर्चगेट-डहाणू४.५८ वा.७.३0 वा.विरार-डहाणू९.४0 वा.१0.३५ वा.विरार-डहाणू११.५५ वा.१३.१५ वा.विरार-डहाणू१३.२0 वा.१४.४0 वा.दादर-डहाणू१६.४७ वा.१९.१५ वा.विरार-डहाणू२१.१0 वा.२२.२५ वा.डहाणू-विरार७.0५ वा.0८.२५ वा.डहाणू-विरार९.३५ वा.१0.५0 वा.डहाणू-विरार११.१0 वा.१२.२५ वा.डहाणू-दादर१४.१५ वा.१६.३0 वा.डहाणू-विरार१७.२0 वा.१८.३५ वा.डहाणू-चर्चगेट१९.४५ वा.२२.१८ वा.डहाणू-विरार२२.३५ वा.२३.५0 वा.
पश्चिम रेल्वेच्या सेवेत १४ नव्या लोकल फेऱ्या
By admin | Published: August 31, 2016 4:00 AM