नवी मुंबई : पोलिसांनी उलवे येथे १२ ठिकाणी छापे मारत १६ नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यापैकी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चौदा जणांना भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे, तर एकाकडे ८४ लाख ८५ हजारांचे अमली पदार्थ आढळून आल्याने त्याला अटक केली आहे.
गत महिन्यात खारघर, वाशी, तळोजा, कोपरखैरणे अशा ६ ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी नायजेरियन व्यक्तींचे ड्रग्स विक्रीचे मोठे रॅकेट उघड केले होते. अखेर शुक्रवारी दुपारी अवघ्या दोन तासांच्या अवधीमध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी धडक दिली.
सायबर सुरक्षेचा कार्यक्रम संपताच आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ड्रग्ज विक्रेत्या नायजेरियन व्यक्तींचा कार्यक्रम करण्याचा प्लान उघड केला. उपायुक्त अमित काळे, विवेक पानसरे, पंकज डहाणे, प्रशांत मोहिते यांनी अमली पदार्थविरोधी पथक व स्थानिक पोलिस अशा सुमारे ३५० कर्मचाऱ्यांची फौज तयार केली. त्यामध्ये सहायक आयुक्त विशाल मेहुल, वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी व इतर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
पोलिसांनी उलवे येथे छापे मारत १६ नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाकडे ८४ लाख ८५ हजारांचे अमली पदार्थ आढळून आल्याने त्याला अटक केली आहे.
२४ घरांची झाडाझडतीया पथकांनी आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे उलव्यातील १२ इमारतींमधील २४ घरांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये १६ नायजेरियन ७ पुरुष व ७ महिलांचे बेकायदेशीर वास्तव्य उघड झाले. त्यांना भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे, तर एका नायजेरियनच्या घरात ७० लाख ६० हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम एमडी व १४ लाख २५ हजाराचे ९५ ग्रॅम कोकेन मिळाले.
ठेवले गाफीलगत महिन्यात खारघर, वाशी येथे कारवाई केल्यानंतर आपल्यावरही कारवाई होईल या भीतीने उलवेतील नायजेरियन सतर्क झाले होते. अशा परिस्थितीत कारवाई केल्यास ते हाती लागले नसते. यामुळे एक महिना त्यांना गाफील ठेवले होते.
पाठलाग करून पकडलेउलवे येथे कारवाईदरम्यान एक नायजेरियन पोलिसांच्या हातून निसटला होता. त्याला पकडताना एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. अखेर काही अंतरावर त्याला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.