नोकरीची सुवर्ण संधी! सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 06:13 AM2023-07-24T06:13:42+5:302023-07-24T06:15:19+5:30

राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे रिक्त आहेत.

14 thousand posts in government hospitals! | नोकरीची सुवर्ण संधी! सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती

नोकरीची सुवर्ण संधी! सरकारी रुग्णालयात १४ हजार पदभरती

googlenewsNext

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालये, दंत महाविद्यालयांत १३ हजार ३९१ पदे रिक्त असून आयुर्वेद महाविद्यालयांत ८७६ पदे रिक्त आहेत. यातील गट अ व गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने व पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व पदे भरली जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयांत रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील ९१, सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे भरण्यात येत आहेत. 
गट क संवर्गातील ५१८० पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  

एमपीएससीमार्फत पदे भरणार

सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. 

याविषयीची मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले आहे. ही पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत. 

Web Title: 14 thousand posts in government hospitals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.