मुंबईतून १४ हजार विद्यार्थी; उद्या २८ केंद्रांवर होणार ‘सेट’, प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 07:30 AM2024-04-06T07:30:18+5:302024-04-06T07:30:37+5:30
SET Exam News: सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ ७ एप्रिलला होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध २८ महाविद्यालयांतील केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी एकूण १४ हजार ४२६ परीक्षार्थी आहेत.
मुंबई - सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ ७ एप्रिलला होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध २८ महाविद्यालयांतील केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी एकूण १४ हजार ४२६ परीक्षार्थी आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील एकूण २८ महाविद्यालयांतील केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतरीत्या पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आल्याचे या परीक्षेचे समन्वयक आणि शहर केंद्रप्रमुख डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले. केवळ एका परीक्षा केंद्रावरील अध्यापकांना निवडणुकीच्या प्रशिक्षणाला जावे लागणार आहे. त्या ठिकाणी महाविद्यालय अतिरिक्त मनुष्यबळ पुरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.