मुंबई : बावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १४ वर्षीय बलात्कार पीडितेने नुकतीच उच्च न्यायालयात गर्भपातासाठी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला तिची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले.पीडितेचा गर्भपात करणे शक्य आहे का आणि ते कितपत योग्य आहे, याचा अहवाल जे. जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सादर करावा, असे निर्देश न्या. भारती डांग्रे यांनी दिले.मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नेन्सी अॅक्टअंतर्गत २० आठवड्यांनंतर गर्भपात केला जाऊ शकत नाही. अपवादात्मक स्थितीतच गर्भपात केला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.‘पीडितेची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नेन्सी अॅक्ट’अंतर्गत पीडितेचा गर्भपात होऊ शकेल का? हे समजेल,’ असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने जे. जे.च्या डॉक्टरांना २८ डिसेंबर रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पीडितेवर तिच्या शेजारी राहणाऱ्या माणसानेच बलात्कार केला. याबाबत तिने मानखुर्द पोलीस ठाण्यात १ डिसेंबर रोजी तक्रार नोंदविली. आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली.
गर्भपातासाठी १४ वर्षीय मुलीची हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 6:50 AM