Join us  

१४०० मेट्रिक टन ऑक्सिजन मुंबई आणि ठाण्यात तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 8:54 AM

कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यापैकी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्यांची संख्या दोन ते पाच टक्के दरम्यान आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही ताण नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-ठाणे  :  मुंबई महानगरात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत असल्याने दुसऱ्या लाटेतील अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजन साठ्यावरची तयारी करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यात आजच १४०० मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन साठा तयार आहे. सध्यातरी ऑक्सिजनची गरज दोन टक्के रुग्णांनाच लागत आहे. 

कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यापैकी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्यांची संख्या दोन ते पाच टक्के दरम्यान आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही ताण नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

मात्र, ही लाट रुग्ण संख्येचा उच्चांक गाठेल, असे गृहीत धरून ऑक्सिजन पुरवठा क्षमता तयार करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यापूर्वीच सर्व स्थानिक प्रशासनांना दिलेल्या आहेत. त्यानुसार, मुंबई आणि ठाण्यात दुसऱ्या लाटेच्यावेळी लागलेल्या सर्वाधिक ऑक्सिजनच्या तुलनेत आता तिप्पट क्षमता तयार करण्यात आली आहे. 

कुठे किती रुग्ण ऑक्सिजनवरमुंबईत दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मागणी २३० मेट्रिक टन होती. आता पालिकेने ६९० मेट्रिक टन साठा केला आहे. हा साठा ११२५ मेट्रिक टनपर्यंत नेता येईल. मुंबईत ऑक्सिजन बेडवर १९३३ आणि व्हेंटिलेटर बेडवर ४२१ रुग्ण आहेत. मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा पालघर जिल्ह्यात  उपलब्ध आहे. सध्या एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. मात्र, रुग्ण वाढत असल्याने पीएसए प्लँटसह ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय काळबांडे यांनी सांगितले.मेट्रिक टन जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन साठा ८० मेट्रिक टन एवढा आहे. ही क्षमता 

१८५ट्रिक टनापर्यंत वाढवता येणार आहे. सध्या दाेनच रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत.

६५७  nजिल्ह्यात ६५७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. जिल्ह्यात ३४४ रुग्ण ऑक्सिजनवर तर २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. nजिल्ह्यात ३१ पीएसए प्लान्ट प्रस्तावित आहेत. त्यापैकी २६ प्लान्टच्या माध्यमातून ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. nसध्या ७६२ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता जिल्ह्यात विकसित केली. याशिवाय अजून २७० मेट्रिक टन साठवण क्षमता विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.