पाच वर्षांत १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:20 AM2019-05-29T05:20:58+5:302019-05-29T05:21:04+5:30
राज्यातील व केंद्रातील सरकार बळीराजाच्या अडचणी सोडविण्यासाठी आग्रही असल्याचा दावा करीत असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढत आहे.
- जमीर काझी
मुंबई : राज्यातील व केंद्रातील सरकार बळीराजाच्या अडचणी सोडविण्यासाठी आग्रही असल्याचा दावा करीत असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढत आहे. गेल्या १८ वर्षांत ३०,३३४ शेतकºयांनी आपले जीवन संपविले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत जवळपास निम्म्यावर म्हणजेच १४,६७० जणांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक जणांच्या वारसांना सरकारने आर्थिक मदत केली असून उर्वरितांना मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागानेच ही आकडेवारी दिलेली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती अधिकार कायद्यान्वये ती मिळविलेली आहे. १ जानेवारी २००१ पासून
ते ३१ मार्च २०१९ पर्यंत एकूण
३०,३३४ जणांनी आत्महत्या केल्याची सरकार दरबारी नोंद आहे. त्यापैकी नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ६१० जणांनी आत्महत्या केली. त्यापैकी १९२ जणांना आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. तर ९६ जण अपात्र ठरवण्यात आले असून उर्वरित प्रकरणे चौकशीअभावी प्रलंबित आहेत.
शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी त्या तोकड्या ठरत असल्याचे
या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
२००१ ते मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत सर्वच महसुली विभागात आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. एकूण ३०,३३४ जणांपैकी १५,१९८ आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत शासनाने दिली आहे.
१४,०२६ शेतकºयांच्या आत्महत्या या निकषात बसत नसल्याचे
स्पष्ट करून अपात्र ठरविण्यात
आले आहेत. त्यापैकी युती सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजेच २०१४ पासून ३१ मार्च २०१९ या कालावधीत १४,६७० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
हे प्रमाण जवळपास त्यापूर्वीच्या १३ वर्षांच्या कालावधीइतकेच आहे. त्यामुळे युती सरकारच्या कालावधीत आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी केवळ सरकार दरबारी नोंद असलेली असून त्याशिवाय नोंद न झालेली प्रकरणे अनेक असल्याची शक्यता आहे.
>शेतकºयांच्या आत्महत्या
वर्ष आत्महत्या मदतीसाठी अपात्र
पात्र
२०१४ २०३९ १३५८ ६७४
२०१५ ३२६३ २१५२ १०८१
२०१६ ३०८० १७६८ १२९२
२०१७ २९१७ १६३८ ९८७
२०१८ २७६१ १३३० १०५०
मार्च१९ ६१० १९२ ९६
एकूण १४६७० ८४३८ ५१८०
>२००१ ते मार्च २०१९ पर्यंतच्या ३०,३३४ जणांपैकी १५,१९८ आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत शासनाने दिली आहे.