मुंबई : राज्यात शुक्रवारी १४ हजार १६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० इतकी झाली आहे. मात्र, दिवसभरात ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख ७० हजार ८७३ वर पोहचली आहे. सध्या राज्यभरात १ लाख ६४ हजार ५६२ अँक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.सलग दुसºया दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येने १४ हजारांचा टप्पा पार केला आहे. यात पुणे महापालिकेत सर्वाधिक १ हजार ६९२, त्या पाठोपाठ मुंबईतील १ हजार ४०६ रूग्णांचा समावेश आहे. मुंबईसह लगतच्या नऊ महापालिकांसह तीन जिल्हा स्थानांचा समावेश असलेल्या ठाणे आरोग्य मंडळात ३ हजार ८३३ कोरोनाचे रूग्ण आढळले. यातही मुंबई महापालिका क्षेत्राचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणांवर तुलनेत कमी रूग्ण आढळून आले. तर, पुणे मंडळात एकूण ४ हजार १८ रूग्णांची नोंद झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रातील १,६९२ रुग्णांसोबत जिल्हा क्षेत्रातील ७५६, पिंपरी चिंचवड मनपातील ९४६, सोलापूर मनपा ३७, सोलापूर जिल्हा क्षेत्रात २६२ आणि सातारच्या ३२५ रूग्णांचा समावेश आहे.राज्यात दिवसभरात ३३९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के इतके आहे.रायगडमध्ये ४४८ नवीन रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवार २१ आॅगस्ट रोजी ४४८ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २२ हजार ६४६ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९ हजार १२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.गुरुवारी पनवेल पालिका १६५, पनवेल ग्रामीण ६७, उरण ९, खालापूर २९, कर्जत १६, पेण ३२, अलिबाग ५८, मुरुड २, माणगाव १४, रोहा १९, सुधागड ९, श्रीवर्धन ५, म्हसळा १, महाड २०, पोलादपूर २ असे एकूण ४४८ रुग्ण सापडले आहेत.>वसई-विरारमध्ये २,१३३ रुग्णांवर उपचार सुरूवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शुक्रवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर वसई-विरार व नालासोपारा या भागात दिवसभरात २०४ नवे रुग्ण आढळले. तर २३० रुग्ण बरे होऊ न घरी परतले. त्यामुळे आता २१३३ रुग्ण उपचार घेत असून शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. महापालिकेने दिलेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी महापालिका हद्दीतील एकूण रुग्णसंख्येने १५ हजार ४२८ चा आकडा गाठला आहे. तर पालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या आता ३२४ वर पोहचली आहे.>पुणे महापालिकेत सर्वाधिक १ हजार ६९२, त्या पाठोपाठ मुंबईत १ हजार ४०६ रूग्ण वाढले. पिंपरी चिंचवड मनपातील ९४६, सोलापूर मनपा ३७, सोलापूर जिल्हा क्षेत्रात २६२ आणि सातारच्या ३२५ रूग्णांचा समावेश आहे.>राज्यातदिवसभरात 339 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के इतके आहे.
धोका वाढला! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १४००० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 3:08 AM