तलावांमध्ये १४१ दिवसांचा जलसाठा जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:02+5:302021-07-22T04:06:02+5:30
मुंबई : सलग चार दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पाणी टेन्शन निवळले आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५० हजार ९५१ ...
मुंबई : सलग चार दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पाणी टेन्शन निवळले आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५० हजार ९५१ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे तलावांमध्ये सध्या पाच लाख ३१ हजार ७३४ जलसाठा जमा झाला आहे. १४१ दिवस पुरेल इतका हा जलसाठा आहे.
महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते. मागील चार दिवसांत मुसळधार पावसामुळे मुंबईतील विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागले आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १५ जुलैपर्यंत जेमतेम १७ टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात तलावांमध्ये तब्बल १० ते १२ दिवसांचा जलसाठा वाढत आहे. गेल्या वर्षी याच काळात तलावांमध्ये चार लाख आठ हजार ८८५ दशलक्ष लीटर जलसाठा होता. सध्या तलावांमध्ये असलेला जलसाठा पुरेसा नसला तरी दिलासादायक आहे.
२१ जुलै जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)
तलाव.. कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ८२८३७ १५७.४०
तानसा १२८.६३ ११८.८७ ९६६८७ १२५.९६
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८.... ८०.४७
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ .. १३९.२६
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ०००... ५९३.९६
भातसा १४२.०७ १०४.९० २५८८२२ ... १२२.००
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० ५७६४३ .. २५७.३४
वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लीटर)...टक्के
२०२१ - ५३१७३४
२०२० - ४०८८८५
२०१९- ७६५३२४