Join us

अकरावी बायफोकल प्रवेशासाठी १४,३०७ अर्ज; गुरुवारी पहिली मेरिट लिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:12 AM

अकरावी प्रवेशातील द्विलक्षी (बायफोकल) विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातून १४ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

मुंबई : अकरावी प्रवेशातील द्विलक्षी (बायफोकल) विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातून १४ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या विषयांच्या प्रवेशाची मुदत सोमवारी सायंकाळी संपली असून, या विद्यार्थ्यांची पहिली मेरिट लिस्ट गुरुवारी २१ जून रोजी जाहीर होणार आहे.दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाला प्रारंभ झाला आहे. मुंबई विभागात आतापर्यंत सर्व शाखांसाठी २ लाख २२ हजार १६९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी १ लाख ८३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरून प्रवेशाच्या यादीसाठी तयार आहेत. त्यापैकी बायफोकल या विषयासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मुदत सोमवारी संपली असून, या विषयांसाठी प्रवेश घेणारे १४ हजार ३०७ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची पहिली मेरिट लिस्ट गुरुवारी जाहीर होईल.पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर २१ ते २२ जूनपर्यंत महाविद्यालयात जावून प्रवेश घ्यायचे आहेत. त्यानंतर, २८ जून रोजी दुसरी लिस्ट जाहीर होईल.पहिल्या फेरीच्या प्रवेशाच्या काळात बायफोकल विषय वगळता अन्य पारंपारिक शाखांत प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत आहे.>अकरावी प्रवेशाची आकडेवारीविद्यार्थी प्रवेश नोंदणी : २,२२,१६०प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा पूर्ण केलेले विद्यार्थी : १,८३,७६७बायफोकल विषयासाठी अर्जकेलेले विद्यार्थी: १४,३०७