मुंबई विमानतळावर सहा महिन्यांत पकडले १४४ किलो सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 09:09 AM2023-05-24T09:09:50+5:302023-05-24T09:10:14+5:30

सोन्याची किंमत ७६ कोटी : डीआरआयची कारवाई

144 kg gold seized at Mumbai airport in six months | मुंबई विमानतळावर सहा महिन्यांत पकडले १४४ किलो सोने

मुंबई विमानतळावर सहा महिन्यांत पकडले १४४ किलो सोने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशातून तस्करीच्या माध्यमातून सोने भारतात आणण्याच्या घटनांत वाढ होत असून, गेल्या सहा महिन्यांत एकट्या मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर (डीआरआय) यंत्रणेने तब्बल १४४ किलो सोने पकडले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ७६ कोटी रुपये इतकी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांतील सोन्याच्या तस्करीमधील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. विशेष म्हणजे, २०२३ या वर्षामध्ये सोने तस्करीच्या अनेक नव्या कार्यपद्धतीदेखील अधिकाऱ्यांना समजून आल्या आहेत. 

 तस्करीची नवी मोडस् ऑपरेंडी  
    आजवर सोन्याची बिस्किटे, पत्रे किंवा लहान आकाराचे तुकडे किंवा दागिने या माध्यमातून सोन्याची तस्करी होत असे. 
    यंदा सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनदेखील सोन्याची तस्करी झाली आहे. तर, नुकत्याच झालेल्या एका तस्करीच्या कारवाईत सोन्याचे बारीक तुकडे करून ते शरीरात लपवून आणल्याचेही दिसून आले. 
    आजपर्यंत अमली पदार्थ शरीरात लपवून आणत त्याची तस्करी केली जात होती. मात्र, आता सोनेदेखील अशा पद्धतीने शरीरात लपवून आणल्याचे दिसून आल्यामुळे अधिकारीदेखील चक्रावून गेले आहेत.
    चालू वर्षांत आतापर्यंत सोने तस्करीच्या ज्या घटना उघडकीस आल्या त्यापैकी बहुतांश घटनांमध्ये मुंबईच्या काळबादेवी परिसरात एक रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. 
    या माहितीनंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तेथे छापेमारी करत सोने वितळवण्याचा एक छोटा कारखानाच उधळून लावला. 

उपलब्ध माहितीनुसार, २०२२ मध्ये मुंबई विमानतळावर डीआरआय आणि सीमा शुल्क विभागाने एकूण ६०४ किलो सोन्याची तस्करी पकडली. त्याची किंमत ३६० कोटी रुपये इतकी होती.

याच कालावधीमध्ये दिल्ली विमानतळावर एकूण ३७४ किलो सोने पकडण्यात आले, तर सोने तस्करीत चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे ३०६ किलो सोने पकडण्यात आले.

Web Title: 144 kg gold seized at Mumbai airport in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं