मुंबई विभागातून दहावी पुरवणी परीक्षेत १४.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:27 AM2019-08-31T06:27:59+5:302019-08-31T06:28:02+5:30
राज्याच्या निकालाची टक्केवारी २२.८६
मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकाल २२.८६% लागला. सलग तिसऱ्या वर्षी निकालात घट झाली आहे. मुंबई विभागाचा निकाल १४.४८ टक्के इतका लागला.
राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाला. मंडळामार्फत १७ ते ३० जुलै या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळामधून २ लाख ३४ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा सर्वाधिक ३१.४९ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी १४.४८ टक्के निकाल लागला आहे. राज्यात परीक्षा दिलेले सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली.
दहावी पुरवणी परीक्षेच्या निकालमध्ये यंदा सलग तिसºया वर्षी घट झाली आहे. जुलै २०१७ मध्ये २४.४४ टक्के तर जुलै २०१८ मध्ये २३.६६ टक्के निकाल लागला होता. यंदाच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ०.८० टक्क्यांनी घट झाली आहे. लातूर व नागपूर विभागाच्या निकालात सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या मुंबईचा निकालातही किंचित वाढ झाल्याचे दिसते.
च्निकालासाठी संकेतस्थळ - www.mahresult.nic.in
च्गुणपडताळीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३१ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर.
च्उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३१ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर.
च्उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन - छायाप्रत मिळाल्याच्या दुसºया दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत अर्ज करता येईल.
श्रेणीसुधारची संधी
जुलै २०१९ किंवा त्यापूर्वीच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेले पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी तसेच जुलै २०१९ च्या परीक्षेत सर्व विषयांसह पहिल्यांदा परीक्षा दिलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारची संधी मिळेल. या विद्यार्थ्यांना मार्च २०२० मध्ये होणाºया परीक्षेला बसण्यासाठी त्यांचे आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबतच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.