भाऊबीजेसाठी बेस्टच्या १४५ अतिरिक्त गाड्या; लोकलवरील ताण कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 09:43 AM2023-11-14T09:43:20+5:302023-11-14T09:46:01+5:30

प्रवाशांच्या मदतीकरिता गर्दीच्या बसथांब्यांवर व रेल्वेस्थानकाबाहेरील थांब्यांवर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी तैनात राहणार आहेत. 

145 additional trains of BEST for Bhaubij; The stress on the local will be reduced | भाऊबीजेसाठी बेस्टच्या १४५ अतिरिक्त गाड्या; लोकलवरील ताण कमी होणार

भाऊबीजेसाठी बेस्टच्या १४५ अतिरिक्त गाड्या; लोकलवरील ताण कमी होणार

मुंबई : भाऊबीजेच्या दिवशी नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाकडून १४५ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. या बस मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मीरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे) तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरूळ, ऐरोली, घणसोली स्थानक, सीबीडी बेलापूर आदी मार्गांवर धावणार आहेत. आवश्यकतेनुसार यात वाढ करण्यात येणार असून,  प्रवाशांच्या मदतीकरिता गर्दीच्या बसथांब्यांवर व रेल्वेस्थानकाबाहेरील थांब्यांवर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी तैनात राहणार आहेत. 

लोकलवरील ताण कमी होणार

बेस्ट उपक्रमाकडून भाऊबीजेच्या दिवशी बसेसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकल सेवेवरील ताण काहीअंशी होण्याची शक्यता आहे.जादा बसेसमुळे इतर खासगी वाहनांसाठी मोजावे लागणारे पैसे वाचून नागरिकांचा प्रवास  सुखकर होईल. 

Web Title: 145 additional trains of BEST for Bhaubij; The stress on the local will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.