Join us

संध्याकाळच्या ६ वाजेपर्यंत मध्य रेल्वेवरून १४.५ लाख जणांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:23 AM

मध्य रेल्वे मार्गावर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० लाख, तर २४ तासांत अंदाजे १३ लाख जणांनी प्रवास ...

मध्य रेल्वे मार्गावर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १० लाख, तर २४ तासांत अंदाजे १३ लाख जणांनी प्रवास केला होता, तर १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४.५ लाख जणांनी प्रवास केला. यामध्ये रात्री उशिरापर्यंत ५ ते ६ लाख प्रवासी वाढण्याची शक्यता आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ७ लाख आणि २४ तासांत ९.५ लाख जणांनी प्रवास केला, तर १ फेब्रुवारी रोजी ६ पर्यंत ११.५ लाख जणांनी प्रवास केला.

* फुकट्या ३९६ प्रवाशांवर कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर २७५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २३७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. विनातिकीट ३९६ प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून एकूण १ लाख ०४ हजार २७८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

......................