तीन दिवसात पकडली १४.५७ लाखाची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 05:00 PM2020-11-07T17:00:40+5:302020-11-07T17:01:20+5:30
power theft : वीज चोरांविरुद्ध मोहीम
मुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या निर्देशानुसार ३ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या वीज चोरांविरुद्ध धडक कारवाईत तीन दिवसात १४.५७ लाखाची १ लाख ६९ हजार १२९ युनिटची वीजचोरी पकडण्यात आली आहे.
भांडूप परिमंडल अंतर्गत ठाणे, वाशी व पेण या तिन्ही मंडळातील ग्राहकांच्या वीज जोडणीची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये, ठाणे मंडळात ३७ हजार ३८७ युनिटची सुमारे २.३५ लाखाची, वाशी मंडळात ४८ हजार १२० युनिटची सुमारे ५.६४ लाखाची तर पेण मंडळात ८३ हजार ६२२ युनिटची सुमारे ६.५८ लाखाची असे एकूण १ लाख ६९ हजार १२९ युनिटची सुमारे १४.५७ लाखाची वीजचोरी अनधिकृतपणे वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. वीज चोराला चोरी करून वापरलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करून देण्यात आली आहे. सदर रक्कम न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात येऊ शकतो.