मुंबई : राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये शुक्रवारी राज्यात एकूण १४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ३१ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ९३१ आणि मुंबईत १६१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज १२९ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे ३१ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णाला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १६ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ६९४ चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - ३१ठाणे - ५ठाणे मनपा - २५नवी मुंबई मनपा - ११कल्याण-डोंबिवली मनपा -३मीरा भाईंदर मनपा -१पालघर -१रायगड -३पनवेल मनपा - ५