देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार; उद्धव ठाकरे सक्षम नाही; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:58 PM2023-03-06T22:58:57+5:302023-03-06T23:00:01+5:30

संजय राऊतांच्या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे.

15-20 Prime Ministerial candidates in the country; Former CM Uddhav Thackeray is not competent; Criticism of Central Minister Ramdas Athawale | देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार; उद्धव ठाकरे सक्षम नाही; रामदास आठवलेंची टीका

देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार; उद्धव ठाकरे सक्षम नाही; रामदास आठवलेंची टीका

googlenewsNext

मुंबई: सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला जोरदार लढा देण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न केले जात आहेत. यातच संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजय राऊत यांना २०२४ लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, हे पाहा, याबाबत आता भाकीत करणे तेवढे सोपे नाही. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

संजय राऊतांच्या या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळता आले नाही, त्यामुळे ते पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात पंतप्रधानपदाचे १५-२० उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करणे येड्यागबाळ्याचे काम नाही, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं. 

दरम्या, महाविकास आघाडीने ठरवले होते की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करु. विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शेवटी या देशातील मुख्य चेहरा कोणता असेल, यापेक्षा विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान कोण असेल हे आपल्याला नंतर ठरवता येते. पण आधी एकत्र येऊन निवडणुका लढवणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांनी एकत्र येण्यावर उद्धव ठाकरेंचा भर आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 15-20 Prime Ministerial candidates in the country; Former CM Uddhav Thackeray is not competent; Criticism of Central Minister Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.