Join us

नोकरीसाठी एसटी महामंडळात १५ अर्ज, दाेघांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

मराठा आंदोलनातील मृतांचे वारसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आरक्षणासाठी मृत्यू झालेल्यांपैकी १५ वारसांचे नोकरीसाठी एसटी महामंडळात ...

मराठा आंदोलनातील मृतांचे वारस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मृत्यू झालेल्यांपैकी १५ वारसांचे नोकरीसाठी एसटी महामंडळात अर्ज आले आहेत. त्यापैकी दोनजणांना नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलनकर्त्यांनी आपला प्राण गमावला. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास शैक्षणिक पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. नोकरीची कार्यवाही १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश एसटी महामंडळाने एसटी डेपोला दिले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मराठा समाजाच्या वतीने मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर तातडीने राज्य सरकारने निर्णय घ्यावा यासाठी युवक आणि युवकांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या सदस्याला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

* जानेवारीपर्यंत सर्वांना नोकरी देण्याचा प्रयत्न

मराठा आंदोलनातील मृतांपैकी १५ जणांच्या वारसांचे नोकरीसाठी अर्ज आले आहेत. त्यातील दोनजणांना नियुक्ती दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी चार ते पाच जणांना नोकरी देण्यात येईल. जानेवारीपर्यंत सर्वांना नोकरी देण्याचा प्रयत्न आहे.

- शेखर चन्ने,

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

-----------------------