Join us

एसटीत १५ टक्के उपस्थितीची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे; परंतु चालक-वाहकांबरोबर ...

मुंबई : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे; परंतु चालक-वाहकांबरोबर मुंबईतील तिन्ही आगारांमध्ये इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक दिसून येत असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबईत कुर्ला, परळ आणि मुंबई सेंट्रल असे तीन आगार आजमितीस कार्यरत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, सर्व प्रवासी बसेस बंद केल्या आहेत. १५ टक्के उपस्थिती महामंडळात असायला पाहिजे, असे परिपत्रक महामंडळाला प्राप्त झाले आहे, परंतु असे असतानाही तिन्ही आगारांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून पालिका प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम महामंडळात पाळले जात असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ज्यांना ड्यूटी दिली आहे, अशांनीच कामावर यावे, ज्यांना ड्यूटी नाही, अशांनी घरीच बसावे, अशाही सूचना दिल्या आहेत. मग कर्मचारी ड्यूटीवर का येतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

* नियमांचे पालन करतो

कोरोनामुळे प्रवासी बसेस बंद आहेत. अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यास आम्ही कामावर येत आहोत. ड्यूटीवर आल्यावर कोरोना नियमांचे पालन करतो.

- चालक

* मास्कचा पुरेपूर वापर करतो

कोरोना महामारीमुळे १५ टक्के उपस्थितीच्या सूचना दिल्या आहेत; परंतु अधिकाऱ्यांनी ड्यूटीवर येण्याच्या सूचना दिल्यास ड्यूटीवर येतो. या दरम्यान, मास्कचा पुरेपूर वापर करतो.

- वाहक

* सोशल डिस्टन्सिंगचे पालन

मुंबईत चालक, वाहकवगळता इतर अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येत आहे. मात्र दोन आणि तीन शिफ्टमध्ये बोलविले जात असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे.

- वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

जिल्ह्यातील एकूण आगार

०३

चालक-वाहक १२००

यांत्रिकी कर्मचारी ४५०

प्रशासकीय अधिकारी /कर्मचारी - १८०

एकूण अधिकारी कर्मचारी १८३०