मुंबई : अणुशक्तीनगर मतदार संघातून अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पाचजणांनी माघार घेतली असून 15 उमेदवार रिगणात राहिले आहेत. महायुती, काँग्रेस आघाडी व मनसेच्या उमेदवारात तिरंगी लढत होणार आहे.
सेनेचे तुकाराम काते, मुंबई राष्ट्रवादीचे नवाब मलिक या पारपांरिक प्रतिस्पर्ध्यात लढत होत आहे. त्याचबरोबर मनसेचे विजय रावराणे यांच्यासह अन्य 13 जण रिंगणात आहेत.