मुंबईत दीड कोटी लसीकरण पूर्ण; फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लस देण्याचे महापालिकेचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:17 AM2021-11-11T07:17:27+5:302021-11-11T07:17:45+5:30

मुंबईत १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.

1.5 crore vaccinations completed in Mumbai; BMC aims to vaccinate all Mumbaikars by February | मुंबईत दीड कोटी लसीकरण पूर्ण; फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लस देण्याचे महापालिकेचे लक्ष्य

मुंबईत दीड कोटी लसीकरण पूर्ण; फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लस देण्याचे महापालिकेचे लक्ष्य

Next

मुंबई : राज्यात नुकताच दहा कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाल्यानंतर आता मुंबईनेदेखील दीड कोटींचे लक्ष्य गाठले आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून एक कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ लस देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ पर्यंत संपूर्ण मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी ४ मेपासून ज्येष्ठ नागरिकांकरिता ड्राईव्ह-इन लसीकरण सुरू करण्यात आले. स्तनदा मातांसाठी २६ मेपासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरिता १ जूनपासून लसीकरण राबविण्यात येत आहे. अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन २ ऑगस्टपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे. 

एकूण लाभार्थी - ९२ लाख ३६ हजार ५०० 
आतापर्यंत पहिला डोस घेणारे - ९२ लाख चार हजार ९५० (९९ टक्के लसीकरण)
दुसरा डोस पूर्ण झालेले - ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के लसीकरण)

लसीकरणात विक्रमी कामगिरी

१६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू केल्यानंतर ५ मेपर्यंत २५ लाख डोस देण्याचा टप्पा गाठण्यात आला. त्यानंतर २६ जून रोजी ५० लाख, ७ ऑगस्ट - ७५ लाख, ४ सप्टेंबर  - एक कोटी, २८ सप्टेंबर रोजी एक कोटी २५ लाख आणि १० नोव्हेंबर रोजी एक कोटी ५० लाख डोस देण्याचा टप्पा गाठण्यात आला आहे. 

मुंबईत २,७६१ रुग्ण उपचाराधीन; दिवसभरात आढळले ३४७ रुग्ण

मुंबईत बुधवारी ३४७ रुग्णांची नोंद झाली, तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ३६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७ लाख ३६ हजार ९४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहर उपनगरात २ हजार ७६१ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत एकूण ७ लाख ५८ हजार ५३६ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या १६ हजार २८५ इतकी आहे. 

दिवसभरात रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३८ हजार ६६१ चाचण्या करण्यात आल्या असून, एकूण १ कोटी १७ लाख ५४ हजार ७२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून, ३ ते ९ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १५ आहे. गेल्या २४ तासात रुग्णांच्या संपर्कातील २ हजार ६२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध पालिकेने घेतला आहे.

Web Title: 1.5 crore vaccinations completed in Mumbai; BMC aims to vaccinate all Mumbaikars by February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.