सहायक संचालकाच्या घरातून दीड कोटीसह सोन्याची बिस्किटे जप्त; सीबीआयची मुंबईत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 08:27 AM2024-05-08T08:27:04+5:302024-05-08T08:27:12+5:30

रिलायबल ॲनालिटिकल ही लॅब एफएसएसआयशी संलग्न आहे. एफएसएसआयर्फे विविध खाद्यपदार्थ, अन्नघटकांची तपासणी या लॅबतर्फे केली जाते. 

1.5 Crores along with Gold Biscuits seized from Assistant Director's house; CBI action in Mumbai | सहायक संचालकाच्या घरातून दीड कोटीसह सोन्याची बिस्किटे जप्त; सीबीआयची मुंबईत कारवाई

सहायक संचालकाच्या घरातून दीड कोटीसह सोन्याची बिस्किटे जप्त; सीबीआयची मुंबईत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एका खासगी कंपनीचे बिल मंजूर करण्यासाठी १ लाख २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्ड 
ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या (एफएसएसआय) सहायक संचालकाला सीबीआयने मुंबईत अटक केल्यानंतर त्याच्या घरातून १ कोटी ४२ लाखांची रोख रक्कम, सोन्याची दोन बिस्किटे, एक लॅपटॉप तसेच काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. अमोल जगताप असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, रिलायबल ॲनालिटिकल ही लॅब एफएसएसआयशी संलग्न आहे. एफएसएसआयर्फे विविध खाद्यपदार्थ, अन्नघटकांची तपासणी या लॅबतर्फे केली जाते. 

 रिलायबल कंपनीची बिलं मंजूर करण्याच्या बदल्यात अमोल जगतापने एक लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. 

 जगताप याच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी छापेमारी केली. त्यावेळी प्रथम ३७ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, ४५ ग्रॅम सोने आणि काही अचल मालमत्तांची कागदपत्रे सापडली होती. 

 मंगळवारीदेखील पुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, वर नमूद रोख रक्कम व सोने आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहे.

Web Title: 1.5 Crores along with Gold Biscuits seized from Assistant Director's house; CBI action in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.