Join us

जे जे 'तील निर्जंतुकीकरण विभागाकरिता १५ कोटी रुपये

By संतोष आंधळे | Published: October 09, 2023 8:08 PM

हा विभाग अत्याधुनिक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: बहुतांश रुग्णलयात ऑपरेशन थिएटर, आय सी यु मध्ये जी काही शस्त्रक्रियाशी संबंधित उपकरणे, कपडे  रुग्ण उपचारासाठी वापरली जातात. त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम रुग्णालयातील सेंट्रल स्टेराइल सप्लाय डिपार्टमेंट हा विभाग करत असतो. रुग्णालयात  या उपकरणाद्वारे कोणताही संसर्ग रुग्णलयात पसरू ही महत्त्वपूर्ण जबाबदारी या विभागावर असते. जे जे रुग्णालयाच्या या विभागासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने १४ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा विभाग अत्याधुनिक होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सेंट्रल स्टेराइल सप्लाय डिपार्टमेंट ( सी एस एस डी )  हा रुग्णालयाचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. या विभागात रुग्णलयात शस्त्रक्रियां दरम्यान वापरत येणारी सर्व उपकरणे, साहित्य तसेच डॉक्टरांचे ऑपरेशन थिएटर मधील कपडे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हे या विभागागमार्फत करण्यात येते. रुग्णालयात अनेक प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. तो संसर्ग या उपकरणामार्फत सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या सर्व उपकरणांची अतिशय बारकाईने काळजी घेतली जाते. त्याला व्यवस्थित स्वचछ केले जाते. 

रुग्णालयात  सी एस एस डी या विभागाचे प्रमुख म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉक्टर काम पाहत असतात. काही रुग्णलयात यासाठी तज्ज्ञाची स्वतंत्र समिती सुद्धा ते या विभागातील कामावर लक्ष ठेवत असतात. विशेष म्हणजे ही उपकरणे निर्जंतुकीरकण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामुग्री लागते. त्याची किंमत सुद्धा मोठी असते. तसेच रुग्णालयात हा विभाग रुग्णालयातील मध्यवर्ती ठिकणी असणे अपेक्षित असून रुग्णालयातील काही  विभाग वापरून झालेले सर्व गोष्टी ज्याचा पुर्नवापर शक्य आहे या गोष्टी निर्जंतुकीकरणाकरिता या ठिकणी पाठवतात. 

जे जे रुग्णलयाच्या या विभागाच्या बळकटीकरणासाठी विभागाने १४ कोटी ९० रुपये देण्याचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रुग्णालयाच्या या विभागात नवीन अत्याधुनिक उपकरणे येणार आहेत. तसेच संपूर्ण विभागाचा चेहरा बदलणार आहे.

 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल