मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 07:41 AM2024-01-25T07:41:26+5:302024-01-25T07:42:07+5:30

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत.

15-day curfew imposed in Mumbai; The police have planned strict security in the city | मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी

मुंबईत १५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू; पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची केली आखणी

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत धडकणारा मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात २३  जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत. गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तसेच २८ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २३ जानेवारी मध्यरात्रीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवस मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

Web Title: 15-day curfew imposed in Mumbai; The police have planned strict security in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.