१५ लाखांची फसवणूक
By admin | Published: June 2, 2017 03:29 AM2017-06-02T03:29:38+5:302017-06-02T03:29:38+5:30
मुंब्रा भागात चार सदनिका देण्याच्या नावाखाली अब्बास कासीम या बांधकाम व्यावसायिकाने राबोडी-२ येथील साजीद शेख यांची
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्रा भागात चार सदनिका देण्याच्या नावाखाली अब्बास कासीम या बांधकाम व्यावसायिकाने राबोडी-२ येथील साजीद शेख यांची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शेख यांनी कासीम यांच्याकडे १३ मे २०१३ रोजी चार सदनिका बुक केल्या होत्या. त्यांचे मुंब्रा येथील एका इमारतीमध्ये बांधकाम होणार होते. या सदनिकांसाठी त्यांनी धनादेश आणि रोख स्वरूपात १४ लाख ९९ हजार ३७ रुपये मे २०१३ ते ३१ मे २०१७ या कालावधीत कासीम यांना दिले. त्याबदल्यात या चार सदनिका देण्याचा कराराद्वारे व्यवहारही ठरला. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर या चार सदनिका कासीम यांनी अन्य ग्राहकांना विकल्या.
शेख यांना पैसे किंवा सदनिकाही दिल्या नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.