लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील मंडळींना पार्टीत अंमली पदार्थाची विक्री करणाºया दलालाला अटक करून पोलिसांनी रोख रकमेसह कोकेन, एलएसडी डॉटसह एकूण १४ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. बुकल हंसराज चंद्रिया (रा. विला मारिया, फ्लॅट १, चौदावी गल्ली, खार) असे त्याचे नाव असून, अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान पथकाने ही कारवाई केली.चंद्रिया हा ‘सेलिब्रिटीं’ना अंमली पदार्थाचा पुरवठा करण्याचे काम करत असल्याची माहिती अधिकाºयांना मिळाली होती. त्यानुसार, खार येथील त्याच्या फ्लॅटवर शनिवारी रात्री छापा टाकला. त्या ठिकाणी ८ लाख ४८ हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम कोकेन, ४ लाखांचे ९० एल.एस.डॉट व अन्य अंमली पदार्थ मिळून आले. शनिवारी एका पार्टीत तो या अंमली पदार्थांचा पुरवठा करणार होता, असे समजते. त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.सेलिब्रिटींसोबत छायाचित्रेबकुल चंद्रिय्ोा हा नेहमी बॉलीवूडमधील तारे-तारकासमवेत आढळून येत असतो. त्याने रणबीर कपूर, सलमान खान, अभय देवोल यांच्यासह अनेक कलाकारांसमवेतची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केलेली आहेत.
खारमधून १५ लाखांचे अंमलीपदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:57 AM