अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या १५ मेल, एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:28+5:302021-04-28T04:06:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना, लॉकडाऊन आणि अन्य नियमांमुळे राज्यातील मेल, एक्स्प्रेस गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ...

15 mails of Central Railway, Express canceled due to poor response | अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या १५ मेल, एक्स्प्रेस रद्द

अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेच्या १५ मेल, एक्स्प्रेस रद्द

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना, लॉकडाऊन आणि अन्य नियमांमुळे राज्यातील मेल, एक्स्प्रेस गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गाड्या काही काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

अल्प प्रतिसादामुळे दादर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष ७ मेपर्यंत आणि साईनगर शिर्डी-दादर साप्ताहिक विशेष ८ मेपर्यंत रद्द वाढवले आहे. दादर-साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक विशेष १० मेपर्यंत धावणार नाही. याचप्रमाणे साईनगर शिर्डी- दादर त्रि-साप्ताहिक विशेष ११ मेपर्यंत, कोल्हापूर-नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष १० मे पर्यंत आणि नागपूर-कोल्हापूर द्वि-साप्ताहिक विशेष ११ मेपर्यंत, मुंबई- गदग विशेष १० मे पर्यंत आणि गदग - मुंबई विशेष ११ मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष १३ मेपर्यंत आणि नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष १४ मेपर्यंत, पुणे - अजनी साप्ताहिक विशेष १५ मेपर्यंत आणि अजनी-पुणे साप्ताहिक विशेष १६ मेपर्यंत, तसेच पुणे-अमरावती साप्ताहिक विशेष १२ मेपर्यंत आणि अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष १३ मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. नागपूर-पुणे त्रि-साप्ताहिक विशेष १५ मेपर्यंत, पुणे-नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष १३ मेपर्यंत, नागपूर-अहमदाबाद साप्ताहिक विशेष १२ मेपर्यंत आणि अहमदाबाद-नागपूर साप्ताहिक विशेष १३ मेपर्यंत रद्द असेल.

पुणे-अजनी साप्ताहिक विशेष १४ मेपर्यंत, दादर-साईनगर शिर्डी आठवड्यातील चार दिवस ८ मेपर्यंत आणि साईनगर शिर्डी-दादर आठवड्यातील चार दिवस ९ मेपर्यंत, दादर-पंढरपूर त्रि-साप्ताहिक विशेष १० मेपर्यंत आणि पंढरपूर-दादर त्रि-साप्ताहिक विशेष ११ मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद विशेष २८ मेपर्यंत आणि सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष २९ मेपर्यंत, सुरत-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष १४ मेपर्यंत आणि अमरावती-सुरत द्वि-साप्ताहिक विशेष १५ मेपर्यंत धावणार नाही.

.......................

Web Title: 15 mails of Central Railway, Express canceled due to poor response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.