Join us  

१५ लाख वीजमीटर उपलब्ध; ५ लाखांवर नवीन वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:10 AM

मुंबई : वीजमीटरचा तुटवडा भरून काढण्यासाठी पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्रीफेजचे १५ लाख ७६ हजार नवीन मीटर क्षेत्रीय कार्यालयांना ...

मुंबई : वीजमीटरचा तुटवडा भरून काढण्यासाठी पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्रीफेजचे १५ लाख ७६ हजार नवीन मीटर क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

मार्च, २०२० मध्ये कोरोनामुळे वीजमीटर उपलब्धता कमी होती. नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. परिणामी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना वीजमीटर उपलब्ध होईल, यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. निविदांतर्गत पुरवठादारांना मार्च महिन्यापासून सिंगल फेजचे १८ लाख, तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश देण्यात आले. आता वीजमीटरचा तुटवडा संपुष्टात आला आहे. नवीन वीजजोडण्यांचा वेगही वाढला आहे.

----------------------

मार्च, २०२१ पासून नवीन वीजमीटर उपलब्ध

- सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार

- थ्री फेजचे १ लाख १० हजार

-------------------

(कंसात थ्री फेज)

पुणे प्रादेशिक कार्यालय - सिंगल फेज ४ लाख ६२ हजार (३९,१०३)

कोकण - सिंगल फेज ५ लाख ४५ हजार (३७,७८७)

नागपूर - २ लाख ९५ हजार (२२,८६०)

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय - सिंगल फेज १ लाख ६४ हजार व थ्री फेज १०,२५०

----------------------

वर्षभरात ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात

मार्च ते जुलै, २०२१ च्या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित

----------------------

लघू व उच्चदाब वर्गवारी : नवीन वीजजोडण्या

घरगुती - ३ लाख ८९ हजार ४७

वाणिज्यिक - ५९ हजार ९६९

औद्योगिक - १० हजार ९६३

कृषी - ५० हजार १७८

पाणीपुरवठा व पथदिवे - ७४२

इतर ७२४३

एकूण ५ लाख १८ हजार १४२