मुंबई - गुरुचं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान महत्त्वाचं असते. आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा (Gurupurina 2022). या निमित्तानेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackery) यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशिर्वाद घेतली. त्यानंतर, ठाण्यातील टेंभीनाका येथे जाऊन आनंद दिघेंच्याही प्रतिमेला अभिवादन केले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना गुरू मानून अनेकांनी त्यांचेही दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठींबाही दिला आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी उल्हासनगर महानगरपालिकेचे १५ हून अधिक नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार प्रमाण मानून तसेच आनंद दिघे यांच्या विचारांना अनुसरुन आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नाशिक, दिंडोरी येथील काही नगरसेवकांनी देखील आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. नगरसेवकांच्या या पाठींब्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला मोठे बळ मिळाल्याचंही शिंदे म्हणाले.
जळगावच्या 5 नगरसेवकांचा पाठींबा
जळगाव महापालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील घडत असलेल्या घडामोडींचे पडसाद महापालिकेच्या राजकारणात देखील उमटत असून, सत्ताधारी गटातील सेनेच्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने शिंदे गटाला जाहीर पाठींबा दिल्याचे दिला. पाच नगरसेवकांमध्ये दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, रेश्मा कुंदन काळे, प्रतीभा देशमुख यांचा समावेश आहे. त्यांच्याआधी मनपातील सभागृह नेते ललित कोल्हे, सिंधूताई कोल्हे, प्रविण कोल्हे यांनी देखील आधीच शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे मनपातील सत्ताधारी गटातील जवळ-जवळ ८ नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन केले आहे.