Join us

मुंबईतील १५ टक्के तरुण दररोज ई-सिगारेट ओढतात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:16 AM

सलाम बॉम्बे फाउंडेशनचा निष्कर्ष : आरोग्यासाठी घातकच

मुंबई : मुंबईतील १५ टक्के तरूण दररोज ई-सिगारेट ओढतात, असा निष्कर्ष सलाम बॉम्बे फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणातून मांडला आहे़ ३१ मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो़ त्या निमित्ताने फाउंडेशनने हे सर्वेक्षण केले़

‘तंबाखू आणि फुप्फुसाचे आरोग्य’ या शिर्षकाखाली फाउंडेशनने वाय़ व्ही़ चव्हाण सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, आरोग्यसेवेच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे, आरोग्यसेवेचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ जगदीश कौर, सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि मुंबईतील महानगरपालिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

सलाम फाउंडेशनच्या निष्कर्षांनुसार, ई-सिगारेट्स वापरणाऱ्यांपैकी ८०% व्यक्तींनी त्या आधी कोणतेही तंबाखूयुक्त उत्पादन वापरलेले नव्हते. या पाहणीत सहभागी झालेल्या पाचपैकी चार युवकांनी असे सांगितले की, त्यांनी यापूर्वी कोणतेही तंबाखू उत्पादन वापरून पाहिलेले नाही. यातून असे सिद्ध होते की, ई-सिगारेट्सच्या वापर सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहेच, शिवाय हे तरुण या सवयीच्या आहारी जाऊन अखेरीस प्रत्यक्ष तंबाखूचे व्यसन करू लागतात. तर, ५६ टक्के तरुणांना ई-सिगारेट्स म्हणजे धूम्रपानासाठीचा एक सुरक्षित पर्याय आहे, असे वाटत होते. शिवाय मुंबई शहरातील ३०६ तरुणांपैकी ७३% तरुणांना ई-सिगारेट्सची माहिती होती. ही माहिती असलेल्या तरुणांपैकी ३३% तरुणांनी ई-सिगारेट वापरले होते. तर, १५ टक्के तरुण दररोज ई-सिगारेट वापरतात.

ई-सिगारेट्सच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत, तरीही त्या काही विक्रेत्यांकडे आणि दुकानांमध्ये उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. ई-सिगारेट्सवर बंदीची मागणी करणारी तरुणांच्या स्वाक्षºयाची मोहीमही या वेळी राबविण्यात आली.

सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रकल्प (प्रतिबंधात्मक आरोग्य आणि संशोधन) विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट शेरींग भुतिया म्हणाले, तरुणांकडून होणाऱ्या ई-सिगारेट्सच्या वापरामुळे त्यांना तंबाखूच्या सिगारेट्सचे व्यसन लागण्याची शक्यता आहे. ई-सिगारेट्स उत्पादने आकर्षक रंग आणि फ्लेव्हर्सचे आमिष दाखवून तरुणांना लक्ष्य करत आहेत. तंबाखू सेवनापासून दूर राहावे, यासाठी या व्हेपिंग उत्पादनांवर बंदी आणणे गरजेचे आहे.५६ टक्के तरुणांना ई-सिगारेट्स म्हणजे धूम्रपानासाठीचा एक सुरक्षित पर्याय आहे, असे वाटत होते. शिवाय मुंबई शहरातील ३०६ तरुणांपैकी ७३% तरुणांना ई-सिगारेट्सची माहिती होती. ही माहिती असलेल्या तरुणांपैकी ३३% तरुणांनी ई-सिगारेट वापरले होते. तर, १५ टक्के तरुण दररोज ई-सिगारेट वापरतात.

टॅग्स :मुंबईआरोग्य