मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:12 PM2022-03-01T23:12:29+5:302022-03-01T23:13:13+5:30

दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे

15% reduction in water supply in Mumbai city and suburbs | मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

Next

मुंबई : भातसा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने, मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.  सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: 15% reduction in water supply in Mumbai city and suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.