Join us

खोपोलीत 15 विद्याथ्र्याना विषबाधा

By admin | Published: December 07, 2014 1:31 AM

शिळफाटा येथील जनता विद्यालय प्राथमिक शाळेत 3री, 4थी मध्ये शिकणा:या 15 विद्याथ्र्याना शाळेत येण्यापूर्वी रस्त्यावरील चायनीज भेळ खाल्याने उलटय़ा - जुलाबाचा त्रस सुरू झाला.

चायनीज भेळ खाल्ल्याने झाला त्रस : खोपोलीतील जनता विद्यालयातील घटना, दोघांवर गुन्हा
खोपोली :  शिळफाटा येथील जनता विद्यालय प्राथमिक शाळेत 3री, 4थी मध्ये शिकणा:या 15 विद्याथ्र्याना शाळेत येण्यापूर्वी रस्त्यावरील चायनीज भेळ खाल्याने उलटय़ा - जुलाबाचा त्रस सुरू झाला. या विद्याथ्र्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी 1 वाजता शाळा सुरू असताना हा प्रकार घडला.
प्राथमिक शाळेत शिकणा:या जान्हवी पवार, आदिती गायकर, वरद गावडे, साहित्य शेख, रुकतरे सुर्वे, पीयूष सुर्वे, यश पाटील, चरण पाटील, महेश पवार, आस्ता उपाध्ये, सिद्धी मालकर, शुभम पाटील, तेजस पाटील, काशिद जाधव, अष्टांग जाधव या विद्याथ्र्याना दुपारी शाळा सुरू असताना अचानक उलटय़ा व जुलाबाचा त्रस सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने खोपोलीच्या नगर परिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
यातील 1क् जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, चौघांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
या सर्व विद्याथ्र्यानी शाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरील चायनीज भेळ खाल्ल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सदावर्ते यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दीपक आवारे, संजय मलबारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
 
नमुन्यांची तपासणी : चायनीज भेळचे नमुने तपासणीस घेण्यात येणार आहेत. ज्या विद्याथ्र्यानी भेळ खाल्ली त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. संपूर्ण जिल्ह्यात 12 हजार खाद्य विक्रेत्यांना परवाने दिले असून, त्यात या विक्रेत्याचा समावेश नव्हता. या घटनेनंतर खोपोलीसह जिल्ह्यात शाळांसमोर खाद्य पदार्थ विक्रे त्यांवर तातडीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पेण येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधीक्षक एल़ आऱ राठोड यांनी दिली.
 
पालकांनी मुलांना
पैसे देऊ नयेत - मसुरकर
पालकांनी लहान मुलांना खाऊसाठी जास्त पैसे देऊ नयेत. तसेच मुलांनीही रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी केले आहे.