सुरेश लोखंडे, ठाणेठाणे जिल्हा परिषदेसाठी (जि.प.) ५५ गट निर्माण करण्यात आले असून पाच पंचायत समित्यांसाठी ११० गणांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी जि.प.च्या गटांतून एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ११ जागा तर एससीच्या उमेदवारांसाठी चार जागा आदी १५ जागांचे आरक्षण ५५ गटांमधून काढले जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी एससी, एसटी, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) आणि महिला प्रवर्गासाठी नियमानुसार जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. यासाठी १३ नोव्हेंबर रोजी चिठ्ठ्या काढून प्रवर्गनिहाय आरक्षण घोषित केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ गटांमधून आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या गटांची सोडत ठाणे येथील जिल्हा नियोजन भवन येथे ११ वाजेपासून काढली जाणार आहे. पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांमधून आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या गणांची सोडत त्या-त्या पंचायत समित्यांच्या कार्यालयात काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ गटांमधून एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ११ जागा आणि एससीच्या उमेदवारांसाठी चार जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित ४० गटांमधून नामाप्रसाठी २७ टक्के म्हणजे ११ जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
ठाणे जि.प.तील एससी- एसटीसाठी १५ जागा आरक्षित
By admin | Published: November 05, 2014 10:21 PM