मुंबई शहरात १५ हजार निवडणूक कर्मचारी, तर २ हजार मतदान केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:11 AM2019-04-14T06:11:10+5:302019-04-14T06:11:30+5:30
दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील २ हजार ६०१ मतदान केंद्रे आहेत.
मुंबई : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील २ हजार ६०१ मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि १५ हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा दुसरा टप्पा शनिवारी पार पडला. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संगणकीय पद्धतीने नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मुंबईत चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया तीन टप्प्यांत होते.
तिसºया टप्प्यातील प्रक्रिया प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी पार पाडली जाते. मतदान प्रक्रिया निर्भय, नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे निवडणूक कर्मचारी तसेच ईव्हीएमचे रॅण्डमायझेशन पूर्ण करण्यात आले. यामुळे मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी कोणत्या कर्मचाºयास, कुठल्या विधानसभा मतदारासंघात काम करण्यास जावे लागेल, याची प्रशासकीय स्तरावर निश्चिती करण्यात आली. या वेळी मुंबई शहर जिल्ह्यासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक एस.के. मिश्रा, शिल्पा गुप्ता, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी व शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, जिल्हा सूचना अधिकारी कविता पाटील आदी उपस्थित होते. या वेळी केंद्रीय निरीक्षकांनी योग्य वेळी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून मतदान वेळेत सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या. शहरातील दोन मतदारसंघांत एकूण २ हजार ६०१ मतदान केंद्र आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर किमान पाच कर्मचाºयांची आवश्यकता असते. तसेच ऐनवेळी गरज भासल्यास अतिरिक्त कर्मचाºयांची कुमक तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यकतेपेक्षा किमान दहा टक्के अधिक कर्मचारी आरक्षित म्हणून कर्तव्यावर असणे गरजेचे असते.