Join us

हृदय प्रत्‍यारोपणानंतर १५ वर्षीय विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 3:39 AM

नव्या वर्षातील पहिले हृदय प्रत्यारमुलुंड येथील खासगी रुग्णालयात पेडिएट्रिक कार्डियक सर्जरीचे वरिष्‍ठ सल्‍लागार डॉ. धनंजय मालणकर यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत कार्डियक स्‍पेशालिस्‍टच्या टीमने मुंबईतील १५ वर्षीय विद्यार्थ्‍याचे यशस्‍वीरित्‍या जीवनदायी हृदय प्रत्‍यारोपण केले..

मुंबई : मुंबईतील ४५ वर्षीय व्‍यवसाय मालकाची पत्‍नी व आईने त्‍याचे अवयवदान करण्‍यास संमती दिल्‍यानंतर १५ वर्षांच्या लहानग्याला नव्या आयुष्याची भेट मिळाली. २०२१चे मुंबईतील पहिले हृदय प्रत्‍यारोपण असलेली ही शस्‍त्रक्रिया अडीच तासांमध्‍ये पूर्ण झाली. मुलुंड येथील खासगी रुग्णालयात पेडिएट्रिक कार्डियक सर्जरीचे वरिष्‍ठ सल्‍लागार डॉ. धनंजय मालणकर यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत कार्डियक स्‍पेशालिस्‍टच्या टीमने मुंबईतील १५ वर्षीय विद्यार्थ्‍याचे यशस्‍वीरित्‍या जीवनदायी हृदय प्रत्‍यारोपण केले..दाता कॅटास्‍ट्रोफिक पोस्‍टेरिअर सर्क्‍युलेशन इन्पाफर्क्‍ट (इस्‍केमिक स्‍ट्रोक)ने पीडित होता. तो मेंदू मृत झाल्यानंतर कुटुंबाचे अवयव दानाबाबत समुपदेशन केले, त्यानंतर रुग्‍णाची पत्‍नी व आईने अवयव दानास संमती दिली. ऑर्गन रिट्रायव्‍हल व प्रत्‍यारोपण प्रक्रिया सुरू केली. वैद्यकीय टीम्‍स, परिचारिका टीम्‍स व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्‍यांनी समन्‍वयाने शस्‍त्रक्रिया यशस्‍वी केली. रुग्‍ण हार्ट फेल्युअर अधिक बिकट असण्‍याच्‍या अवस्‍थेमध्‍ये भरती झाला होता. दात्याच्‍या कुटुंबाने घेतलेल्‍या अवयव दानाच्या निर्णयामुळे त्याला जीवनदान मिळण्‍यास मदत झाली, असे पेडिएट्रिक कार्डियक सर्जरीचे वरिष्‍ठ सल्‍लागार मालणकर म्हणाले.मुलुंड येथील रुग्णालयाच्या बालहृदयरोग विभागाच्या वरिष्‍ठ सल्‍लागार डॉ. स्‍वाती गरेकर म्‍हणाल्‍या, डायलेटेड कार्डियोमायोपॅथी हा गंभीर आजार आहे. या मुलाचे हृदय अत्‍यंत कमकुवत व मोठे होते. आमची टीम प्रत्‍यारोपण करण्‍यात यशस्‍वी ठरली, हे अत्‍यंत प्रशंसनीय आहे. जगभरात दरवर्षाला ५००० हृदय प्रत्‍यारोपण केले जातात, ज्‍यापैकी जवळपास ५०० प्रत्‍यारोपण मुलांवर करण्‍यात येतात. हृदय प्रत्‍यारोपण प्राप्‍तकर्ते त्‍यांचे सामान्‍य जीवन जगू शकतात, पण त्‍यांना औषधोपचाराचे काटेकोरपणे पालन करावे लागते आणि रिजेक्‍शन व इन्‍फेक्‍शनसाठी ठरावीक कालांतराने चाचणी करावी लागते. दात्याच्या कुटुंबाचे आभारडायलेटेड कार्डियोमायोपॅथीमुळे माझ्या मोठ्या मुलाचा १३व्‍या वर्षी मृत्‍यू झाला. त्‍यावेळी मुंबईमध्‍ये हृदय प्रत्‍यारोपण प्रोग्रॅम नव्‍हता. काही महिन्‍यांनंतर माझ्या लहान मुलाची तपासणी करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आणि त्‍यालाही हाच आजार झाल्याचे निदान झाले. हृदय प्रत्‍यारोपणाची गरज होती. मी मुलासाठी मदत घेण्‍यसाठी केरळला गेलो, जेथे मला समजले की मुंबईचे पहिले हृदय प्रत्‍यारोपण मुलूंड येथील रुग्णालयात झाले होते. मी तेथील डॉक्‍टरांच्‍या टीमला भेटलो आणि आशेचा किरण दिसला. अखेर माझ्या मुलाला नवीन हृदय, नवीन जीवन मिळाले. आमच्‍या मुलाचे जीवन वाचवण्‍यासाठी मी दात्याच्‍या कुटुंबाचे आभार मानतो. माझ्या मुलाला काही दिवसांपूर्वी डिस्‍चार्ज देण्‍यात आला आणि तो यंदा त्‍याची दहावीची बोर्ड परीक्षा देऊ शकेल.     - रुग्णाच्या वडिलांची प्रतिक्रिया