वडाळ्यावर १५० सीसीटीव्हींचा वॉच!

By admin | Published: January 17, 2016 03:21 AM2016-01-17T03:21:26+5:302016-01-17T03:21:26+5:30

वाढत्या गुन्हेगारीला थोपविण्यासाठी वडाळ्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने परिसरात दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी पोलिसांनीही

150 cct Watch on Wadala! | वडाळ्यावर १५० सीसीटीव्हींचा वॉच!

वडाळ्यावर १५० सीसीटीव्हींचा वॉच!

Next

- समीर कर्णुक,  मुंबई
वाढत्या गुन्हेगारीला थोपविण्यासाठी वडाळ्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने परिसरात दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी पोलिसांनीही मंडळाला मदत केली आहे. सीसीटीव्हीच्या नियंत्रण कक्षासाठी बीट चौकीच पोलिसांनी मंडळाच्या ताब्यात दिली आहे.
वडाळ्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने परिसरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेतली. मंडळाची ही कल्पना पटल्याने त्यांनीही तत्काळ मंजुरी दिली. त्यानुसार मागील दीड वर्षापासून सीसीटीव्हीचे काम हाती घेण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालय, बस स्टॉप, सभागृह, मंदिर, बाजार, सिग्नल आणि रेल्वे स्थानकाबाहेर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
१४५ कॅमेरे बसविण्यासाठीची जागा ठरवण्यात आली असून, यासाठी वडाळा परिसरात सर्व्हे करण्यात आला आहे. सात मोठ्या जंक्शनवर उत्तम प्रतीचे कॅमरे बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण
कक्षासाठी मंडळाचे अध्यक्ष जयंत पटेल यांनी पोलीस उपायुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही मोलाची मदत केली आहे.
त्यानुसार वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या पोलीस बीट चौकीची निवड करण्यात आली आहे.

दीड कोटीचा खर्च
मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील वर्गणी सामाजिक कार्यासाठी गुंतवली जाते. विविध उपक्रम मंडळाकडून राबविले जातात. या वर्षी काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीची योजना हाती घेण्यात आली. या योजनेसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

तीन वर्षांसाठी उपक्रम
आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्यात एक नियंत्रण कक्ष तर दुसरा नियंत्रण कक्ष बीट क्रमांक चारमध्ये असणार आहे. येथे सात ते आठ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. सीसीटीव्हीचा देखभाल खर्च मंडळाकडून तीन वर्षांसाठी केला जाणार आहे. या योजनेचा पहिल्या टप्पा २५ जानेवारी रोजी पूर्ण होणार असून, मे महिन्यात हे काम पूर्ण होईल.

Web Title: 150 cct Watch on Wadala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.