Join us

वृक्ष छाटणीसाठी १५० कोटी मातीत! मुंबई पालिकेच्या कामकाजावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:13 AM

मुंबईतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणे किंवा एखादा वृक्ष अडचण ठरत असल्यास त्याची कापणी करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १५० कोटी रुपये मातीत घालवल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे.

- अजय परचुरेमुंबई : मुंबईतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणे किंवा एखादा वृक्ष अडचण ठरत असल्यास त्याची कापणी करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १५० कोटी रुपये मातीत घालवल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. दरमहा होणारा प्रत्यक्ष खर्च आणि कंत्राटदाराने दाखवलेल्या खर्चात तीन कोटींची तफावत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या कामकाजावरच संशय व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईत अवैधपणे होणाऱ्या झाडांच्या छाटणीबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी २०१५ साली महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बाथेना यांना पालिकेच्या काही गोष्टींबद्दल संशय आला. फांद्यांची छाटणी करणे, झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडांभोवती वर्तुळाकार जाळी तयार करणे यासाठी महापालिकेने २०१६ साली एका खासगी कंत्राटदाराबरोबर २०१६ ते २०१९ अशा प्रकारे तीन वर्षांसाठी करार केला आहे. करारानुसार कंत्राटदाराने आतापर्यंत या कामाचे १५० कोटी रुपये पालिकेकडून घेतले आहेत, अशी माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत समोर आली. यात झाडांच्या छाटणीवर आणि त्याच्या होणाºया संरक्षणावरचा खर्च यात बरीच तफावत आढळली.महिन्याला ४ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र पर्यावरणप्रेमींनी या कामाचा दर्जा आणि प्रत्यक्षात होणारे काम याची पडताळणी केली असता हा खर्च दरमहा फक्त १ कोटीच्या घरात जात आहे. म्हणजे दरमहा होणाºया खर्चात तीन कोटींची तफावत आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, जो महिना खर्च केला जातो त्याची कागदोपत्री आकडेवारीही गोंधळात टाकणारी आहे. छाटणी, कापणीचा खर्च व कंत्राटदाराने दाखवलेला खर्च यात तफावत आहे. तफावतीचा पैसा गेला कुठे? याचा ताळेबंद पालिका कागदोपत्री दाखवू शकली नाही. ही बाब पर्यावरणप्रेमी उच्च न्यायलयाच्या निदर्शनास आणून देणार आहेत.यासंदर्भात मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.माहिती सादर करणारयाबाबत बोलताना बाथेना यांनी सांगितले की, २०१५ ला आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढे पालिकेने एका वर्षानंतर या कामासाठी खासगी कंत्राटदार नेमला. झाडांची योग्य छाटणी करणे आणि झाडांभोवती संरक्षक जाळी उभारणे हे या कंत्राटदाराचे प्रमुख काम होते. मात्र, या कामांना बगल देत कंत्राटदाराने कामाचे पैसे तर उकळलेच शिवाय झाडांची जास्त प्रमाणात छाटणी केली, तेव्हाच आम्हाला संशय आला; आणि आम्ही माहिती अधिकारात जी माहिती मिळविली ती अतिशय धक्कादायक होती. आम्ही उच्च न्यायालयात सुरू असणाºया केसमध्येच ही माहिती न्यायालयात सादर करणार आहोत.असा केला खर्चमहापालिकेच्या अखत्यारीत येणारा उद्यान विभाग खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून या कामासाठी महिन्याला तब्बल ४ कोटी रुपये खर्च करतो.या अर्थाने गेल्या ३ वर्षांत महापालिकेने १५० कोटी रुपये या कामासाठी खर्च केल्याचा खुलासा माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून पर्यावरणप्रेमींनी केला आहे.कामाचा दर्जा आणि प्रत्यक्षात होणारे काम याची पडताळणी केली असता हा खर्च दरमहा फक्त १ कोटीच्या घरात जात आहे. म्हणजे दरमहा होणाºया खर्चात तीन कोटींची तफावत आहे.तफावतीचा पैसा नेमका गेला कुठे, याचा तंतोतंत ताळेबंद महापालिका कागदोपत्री दाखवण्यात अपयशी ठरली आहे.या कामाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने एवढ्यावरच न थांबता पैशांच्या हव्यासापोटी अजूनही नवनवीन उद्योग केले आहेत. झाडे चांगल्या परिस्थितीत असूनही त्यांची मुद्दामून छाटणी करून, त्यातून मिळणारे लाकूड परस्पर विकून पैसे कमविण्याचे कामही या कंत्राटदाराने केल्याचा आरोप झोरू यांनी केला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईकरांकडून कररूपाने घेतलेले पैसे या कामासाठी कशा प्रकारे खर्च केले, याचा खुलासा करावा अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.महापालिकेचा कंत्राटदाराला मिळालेलीवॉर्ड (विभाग) रक्कम (कोटी रुपये)ए ५,५८,३००बी १,७४,४००सी ९,३३,३००डी ५,८४,६००ई ३,७६,०००एफ साउथ ६,५५,७००एफ नॉर्थ ७,०९,५००जी साउथ ७,३८,८००जी नॉर्थ ८,९२,६००एच ईस्ट ६,९२,९००एच वेस्ट ८,१०,२००के ईस्ट ८,९१,२००के वेस्ट ७,९९,०००पी साउथ ६,९३,३००पी नॉर्थ ६,७४,३००एल ४,८७,६००एम इस्ट ५,८१,२००एम वेस्ट ५,८६,१००एन ९,३७,८००एस ६,३६,४००टी ६,६२,४००आर साउथ ७,८१,६००आर सेंट्रल ८,३०,१००आर नॉर्थ ४,०५,२००एकूण १५०,००५७,४९०

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई