मनसेनं मनं जिंकली! १५० लोको पायलटला मिळवून दिला न्याय, राज ठाकरेंची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:36 PM2022-02-18T14:36:12+5:302022-02-18T14:38:00+5:30
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे.
मुंबई :
रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी घेतलेल्या भरतीत १५० उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. या १५० नवनियुक्त असिस्टंट लोको पायलट कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आणि आभार मानले.
आज भेटीप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेत हलगर्जी करत असून अद्याप आणखी १५० पदांची भरती शिल्लक आहे. या पदासाठीची वेटिंग लिस्ट लवकर न भरल्यास तीव्र आंदोलन करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने दिला आहे.