मनोज गडनीस, मुंबई - गेल्या काही महिन्यांत गो-फर्स्ट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांची १०० पेक्षा जास्त विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवर स्थिरावली असली तरी आगामी वर्षभरात भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात तब्बल १५० नवी विमाने दाखल होणार आहेत. यामुळे, सध्या विमानाची संख्या कमी झाल्यामुळे तिकीट दरांत जी वाढ झाली आहे ती वाढ आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याचे मानले जाते.
यामध्ये एअर इंडियाच्या ताफ्यात ९२, इंडिगोच्या ताफ्यात ३५ तर अकासा विमान कंपनीच्या ताफ्यात २० विमाने दाखल होणार आहेत. २०२० च्या एका वर्षात भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात ७२ नवी विमाने दाखल झाली होती. त्यानंतर आता १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये दाखल होणारी १५० नवी विमाने हा एक अलीकडच्या काळातील नवा उच्चांक ठरणार आहे.