Join us

Coronavirus: कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ‘टाटां’कडून १५०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 1:52 AM

भारत आणि जगातील परिस्थिती कमालीची चिंताजनक

मुंबई : कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासाठी टाटा ट्रस्ट टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली आहे.

टाटांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्याची भारत आणि जगातील परिस्थिती कमालीची चिंताजनक बनली आहे. त्यावर तातडीने कृती करणे भाग आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा उद्योग समूह कसोटीच्या काळात नेहमीच देशाच्या मदतीस धावून आला आहे. सध्याची देशातील परिस्थिती भूतकाळातील कोणत्याही संकटापेक्षा अधिक भीषण आहे.

टाटांनी म्हटले की, कोविड-१९ च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तातडीने संसाधने उभी करण्याची अत्यंतिक गरज आहे. हे संपूर्ण मानव जातीसमोरील संकट आहे. या पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्ट व टाटा सन्सकडून १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली जात आहे.

अक्षयकुमारने दिले २५ कोटी रुपये

कोरोनाविरूद्धच्या लढाईत चित्रपट अभिनेता अक्षयकुमारने आपला सहभाग नोंदवला असून, त्याने २५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या घडीला आपल्या लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्याने टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. त्याच्या या कृतीचे त्याची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना हिने कौतुक केले असून, त्याच्या या दानशूरपणाचा अभिमान आहे, असे म्हटले आहे.

जनतेने निधी देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेने निधी द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जनतेला केले.च्सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड असे या निधीचे नाव असून, तो देशाला दीर्घकाळापर्यंत आरोग्यदायी बनवण्यासाठी कामी येणार आहे.

आता आणि यापुढेही जेव्हा जेव्हा काही अशा समस्या येतील, तेव्हा तेव्हा हा निधी कामी येणार आहे. या निधीचे अध्यक्ष पंतप्रधान असून, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री सदस्य आहेत.

देशभरातील भाजपचे खासदार आपल्या खासदार निधीतून कोरोनाच्या मुकाबल्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये देणार आहेत.टाटांनी म्हटले की, ही मदत पुढील उद्देशांसाठी देण्यात येत आहे - कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे उपलब्ध करून देणे. रुग्णांना श्वसन सहायक यंत्रणा उपलब्ध करून देणे. दरडोई तपासणीचे प्रमाण वाढावे यासाठी

टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे.

बाधित रुग्णांसाठी मोड्युलर ट्रीटमेंट सुविधा उपलब्ध करून देणे. आरोग्य कर्मचारी,सामान्य नागरिकांसाठी जाणीव जागृती व्यवस्थापन तसेच प्रशिक्षण.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारतन टाटाभारत